Share

Bigg Boss Marathi 6 : रितेश भाऊ परत येतोय, 16 स्पर्धकांसह होणार ‘राडा’

Bigg Boss Marathi Season 6, hosted by Riteish Deshmukh, is set to premiere on January 11 with over 16 contestants.

Published On: 

Bigg Boss Marathi 6 hosted by Riteish Deshmukh, is set to premiere on January 11 with over 16 contestants.

🕒 1 min read

मुंबई – घरातील भांडणं, ग्रुपिझम, टास्कमधील राडा आणि वीकेंडला होणारी शाळा… हे सगळं मिस करत आहात ना? मग तयार राहा, कारण महाराष्ट्राच्या मनोरंजनाचा ‘बाप’ परत येतोय! ‘बिग बॉस मराठी’च्या चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे, कारण अखेर शोची तारीख जाहीर झाली आहे.

गेल्या पर्वात ज्यांनी आपल्या खास स्टाईलने स्पर्धकांची शाळा घेतली, ते रितेश देशमुख (Riteish Deshmukh) पुन्हा एकदा ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचं (Bigg Boss Marathi 6) सूत्रसंचालन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या ११ जानेवारी २०२६ पासून रोज रात्री ८ वाजता ‘कलर्स मराठी’ आणि ‘JioHotstar’ वर मनोरंजनाचा हा महासंग्राम सुरू होणार आहे.

Bigg Boss Marathi 6 Riteish Deshmukh

हा सीझन नेहमीसारखा नसेल. यावेळी बिग बॉसचं घर पूर्णपणे नव्या रूपात आणि नव्या रचनेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” अशी या पर्वाची टॅगलाईन असून, प्रत्येक दारामागे स्पर्धकांसाठी नवीन आव्हानं असणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी १३,००० स्क्वेअर फुटांच्या या भव्य घरात एक-दोन नाही, तर तब्बल १६ हून अधिक स्पर्धक बंदिस्त होणार आहेत. विशेष म्हणजे, यात २१ वर्षांच्या तरूणांपासून ते ५५ वर्षांच्या अनुभवी व्यक्तींपर्यंत सर्वांचा भरणा असणार आहे. त्यामुळे ‘जनरेशन गॅप’मुळे होणारे वाद आणि संवाद पाहण्यासारखे असतील, अशी माहिती दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी दिली आहे.

१०० हून अधिक कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत हे स्पर्धक तब्बल १०० दिवस घालवणार आहेत. रितेश भाऊ म्हणाला त्याप्रमाणे, “यंदा कुठलं दार कुणाचं नशीब उघडेल हे सांगता येत नाही.” त्यामुळे आता ११ जानेवारीला घरात कोणकोणते चेहेरे दिसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!