🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर- राजकारणात एकदा सत्तेची चटक लागली की ती सुटत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आहे. महापालिका निवडणुकीचे ( municipal election ) बिगुल वाजले असून प्रशासकीय राजवटीनंतर तब्बल साडेपाच वर्षांनी होणाऱ्या या रणसंग्रामात जुन्याच चेहऱ्यांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकले आहेत. शहराच्या राजकारणात ९७ माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला असून, काहींनी तर स्वतःऐवजी आपल्या नातेवाईकांना (१० उमेदवार) रिंगणात उतरवून ‘घराणेशाही’चा नवा पायंडा पाडला आहे.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election 2026
सर्वाधिक जुने चेहरे भाजपकडून
या निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने उतरला असून त्यांनी ‘इनकमिंग’वर भर दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. भाजपकडून सर्वाधिक म्हणजेच ३७ माजी नगरसेवक रिंगणात आहेत, तर त्यांच्या ३ नातेवाईकांनाही तिकीट देण्यात आले आहे. त्याखालोखाल शिंदे गटाने १९ माजी नगरसेवकांवर आणि त्यांच्या २ नातेवाईकांवर विश्वास दाखवला आहे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून १८ माजी नगरसेवक आणि ३ नातेवाईक निवडणुकीच्या मैदानात आहेत.
फक्त युती आणि आघाडीच नाही, तर इतर पक्षांनीही जुन्याच शिलेदारांवर भरवसा ठेवला आहे. काँग्रेसकडून ७, अजित पवार गटाकडून ६, शरद पवार गटाकडून ३, तर एमआयएमकडून २ आणि वंचित बहुजन आघाडीकडून ५ माजी नगरसेवक पुन्हा एकदा जनतेच्या दरबारात कौल मागायला सज्ज झाले आहेत.
अपक्ष बिघडवणार गणित?
तिकीट न मिळाल्याने किंवा इतर राजकीय गणितांमुळे ८ माजी नगरसेवक चक्क अपक्ष म्हणून लढत आहेत. हे बंडखोर उमेदवार कोणत्या बड्या नेत्याचा ‘गेम’ करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. २०१५ नंतर थेट आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने निवडणूक होत असल्याने ही लढाई ‘काटे की टक्कर’ होणार, हे निश्चित!
📌 महत्वाच्या बातम्या
- बँका सलग ३ दिवस बंद? ग्राहकांनो ‘अलर्ट’ राहा; ‘या’ तारखेपूर्वीच उरकून घ्या महत्त्वाची कामं!
- “आता अधिकारी होणारच!”; MPSCचा लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज!
- वेगवेगळ्या शोकसभा अन् ‘ते’ तर्क-वितर्क; धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबात दुफळी? हेमा मालिनींनी सोडलं मौन!
- “भाजपने २० वर्षांच्या निष्ठेची ‘ती’ परतफेड केली…”; डोंबिवलीच्या इन्फ्लुएन्सरचा संताप, अखेर राज ठाकरेंनी दिला आधार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












