Share

उद्धव ठाकरे समोर येताच राडा; ‘इंजिन’ अन् ‘धनुष्यबाण’ भिडले! बोरिवलीत नेमकं काय घडलं?

Clash erupts in Borivali as BJP-Shinde faction workers chant slogans in front of Uddhav Thackeray outside MNS candidate’s office.

Published On: 

Eknath Shinde attacks Thackeray brothers, alleging they care about money (Malida) not Marathi people, and vows to free Mumbai from corruption (Bakasur).

🕒 1 min read

मुंबई– निवडणुकीच्या आखाड्यात आरोप-प्रत्यारोप ठीक आहेत, पण थेट बड्या नेत्यांच्या समोरच कार्यकर्ते भिडले तर? मुंबईत काल रात्री असंच काहीसं घडलं. मातोश्रीवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोरिवलीत पोहोचले, पण ते कार्यालयातून बाहेर पडत असतानाच जोरदार राडा झाला. ठाकरे गट, मनसे आणि समोर भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमकं घडलं असं की, उद्धव ठाकरे मागाठणे येथील प्रभाग क्रमांक ११ च्या उमेदवार कविता माने (Kavita Mane) यांच्या प्रचारार्थ त्यांच्या मुख्य कार्यालयात गेले होते. कविता माने या मनसे-ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या ‘शिवशक्ती’च्या संयुक्त उमेदवार आहेत. उद्धव ठाकरेंनी मतदारांशी संवाद साधला आणि ‘इंजिन’ चिन्हासमोरील बटन दाबून विजय निश्चित करण्याचं आवाहन केलं. मात्र, ठाकरे तिथून निघत असतानाच त्याच वेळी शिंदे गट आणि भाजपच्या उमेदवार आदिती खुरसुंगे यांची प्रचार रॅली तिथे धडकली.

उद्धव ठाकरे गाडीत बसून जात असतानाच भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आपल्या नेत्यासमोर विरोधकांचा हा आक्रमकपणा पाहून मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्तेही पेटून उठले. दोन्ही बाजूकडून आरडाओरडा आणि घोषणाबाजी झाल्याने वातावरण चांगलंच तापलं. अखेर पोलिसांनी मध्यस्ती करत वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढचा अनर्थ टळला.

आज ऐतिहासिक सभा!

एकीकडे बोरिवलीत राडा झाला असतानाच, आज मुंबईत एका ऐतिहासिक घटनेची नोंद होणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पहिली संयुक्त सभा आज विक्रोळीत पार पडणार आहे. आदित्य आणि अमित ठाकरेही लवकरच एकत्र सभा घेणार असल्याने मुंबईच्या राजकारणातली उष्णता आता शिगेला पोहोचली आहे.

 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!