Share

थेट बेडरुममधून उचललं, हातात बेड्या अन्…; व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षाची अमेरिकेत रवानगी, ट्रम्प यांचा ‘गेम’!

Venezuela President Nicolas Maduro arrested by US forces from his bedroom, flown to New York in handcuffs, and detained in a notorious Brooklyn jail on drug charges.

Published On: 

Venezuela President Nicolas Maduro arrested by US forces from his bedroom, flown to New York in handcuffs, and detained in a notorious Brooklyn jail on drug charges.

मुंबई – हॉलिवूडच्या एखाद्या ॲक्शन सिनेमालाही लाजवेल असा थरार नुकताच जगाने पाहिला. एका देशाच्या राष्ट्राध्यक्षाला परकीय सैन्य चक्क त्याच्या बेडरुममधून उचलून, हातात बेड्या ठोकून कैद्यासारखं दुसऱ्या देशात नेऊ शकतं? होय, हे प्रत्यक्षात घडलंय. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांच्यावर अमेरिकेने केलेली ही कारवाई पाहून जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Venezuela President Nicolas Maduro arrested by US forces

३ जानेवारीच्या मध्यरात्री अमेरिकन सैन्याने एक गुप्त ऑपरेशन राबवलं. सीएनएनला अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैन्याने मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना थेट त्यांच्या बेडरुममधून बाहेर खेचलं आणि ताब्यात घेतलं. त्यानंतर एका लष्करी विमानाने त्यांना अमेरिकेतील न्यूयॉर्कला आणण्यात आलं. विमानातून उतरताना एका राष्ट्रप्रमुखाच्या (Nicolas Maduro) हातात गुन्हेगारासारख्या बेड्या होत्या, हे दृश्य पाहून अनेकांना धक्का बसला.

मादुरो यांना आता ब्रुकलिनमधील कुप्रसिद्ध ‘मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटर’ (MDC) या तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. हे तुरुंग अमेरिकेतील सर्वात वाईट आणि भयानक मानलं जातं, जिथे वीजपुरवठा खंडित होणे आणि कैद्यांमधील हिंसाचार सामान्य बाब आहे. ज्या मादुरोंनी आलिशान आयुष्य जगलं, त्यांना आता ड्रग डीलर्स आणि कुख्यात गुन्हेगारांसोबत दिवस काढावे लागणार आहेत. त्यांच्यावर (Nicolas Maduro) ड्रग्ज आणि शस्त्रास्त्र तस्करीचे गंभीर आरोप असून मॅनहॅटन कोर्टात खटला चालवला जाईल.

इकडे मादुरोंना अटक होताच, ट्रम्प प्रशासनाने व्हेनेझुएलाची सूत्रं हलवली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. परिस्थिती सुधारेपर्यंत अमेरिकाच व्हेनेझुएलाचा कारभार अप्रत्यक्षपणे हाकणार असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही