Share

कॅलेंडरमध्ये तारखा नोंदवून ठेवा! २०२६ मध्ये ‘या’ दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान; कोलंबोमध्ये होणार ‘हायव्होल्टेज’ ड्रामा

India vs Pakistan 2026 schedule confirmed: Men’s T20 clash on Feb 15 in Colombo and Women’s T20 match on June 14.

Published On: 

India vs Pakistan 2026 schedule confirmed: Men's T20 clash on Feb 15 in Colombo and Women's T20 match on June 14.

🕒 1 min read

पुणे – भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की टीव्ही फोडले जाणार आणि रस्त्यावर शुकशुकाट असणार, हे समीकरण ठरलेलं आहे. २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानला आशिया कपच्या फायनलमध्ये लोळवत तिरंगा फडकवला होता. आता २०२६ मध्येही मनोरंजनाचा हा ‘डोस’ कमी होणार नाहीये, उलट वाढणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, २०२६ मध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यांच्या तारखा आता समोर आल्या आहेत.

दोन्ही देशांमधील राजकीय संबंधांमुळे द्विपक्षीय मालिका बंद असली, तरी आयसीसीच्या स्पर्धांमध्ये हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने येणारच आहेत. पुरुष आणि महिला अशा दोन्ही वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान एकाच गटात असल्याने सामन्याचा थरार नक्कीच बघायला मिळणार आहे.

India vs Pakistan 2026 Schedule

१५ फेब्रुवारीला ‘महामुकाबला’ (T20 World Cup 2026)

भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया एकाच गटात आहेत. या स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सर्वात मोठा सामना १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगणार आहे. राजकीय तणावामुळे भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने आणि पाकिस्तानला भारतात खेळण्यास अडचण असल्याने, हा सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. जर दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचले, तर तो सामनाही श्रीलंकेतच होईल.

फक्त पुरुषच नाही, तर महिला क्रिकेटमध्येही हा थरार पाहायला मिळेल. महिला टी-२० वर्ल्ड कप (१२ जून ते ५ जुलै) दरम्यान होणार असून, यात १४ जून २०२६ रोजी भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघांमध्ये लढत होईल.

याशिवाय १५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात असले, तरी नॉकआऊट फेरीमध्ये हे दोन्ही संघ आमने-सामने (India vs Pakistan) येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे २०२६ हे वर्ष क्रिकेट प्रेमींसाठी ‘ब्लॉकबस्टर’ ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!