🕒 1 min read
सोलापूर – “काय ती झाडी, काय ते डोंगार, काय ती हाटेल…” या एका डायलॉगने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारे शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) आठवतात ना? आता हेच ‘बापू’ आपल्या गावरान ठसक्यात मुंबईकरांची मनं जिंकायला येत आहेत. पण यावेळी त्यांच्या निशाण्यावर निसर्ग नाही, तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आहेत. बापूंची मुंबईत एन्ट्री होणार असल्याने आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
Shahajibapu Patil vs Sanjay Raut
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, येत्या ५ जानेवारीपासून शहाजीबापू मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या आखाड्यात प्रचारासाठी उतरणार आहेत. ‘ABP माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना बापूंनी विरोधकांना थेट अंगावर घेतलंय. “मी महायुतीचा प्रचार करणार आहे आणि संजय राऊतांसारख्याला तर कस्पटासारखा उडवून लावेन,” असं ओपन चॅलेंजच त्यांनी दिलंय. बापूंचा (Shahajibapu Patil) हा आक्रमक अवतार पाहून आता मुंबईतल्या सभा गाजणार हे नक्की झालंय.
त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही निशाणा साधला. “राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊन खूप मोठी चूक केली आहे. आता त्यांचं वलय आणि अस्तित्व हळूहळू संपत जाईल. उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा वापर करून घेतील आणि त्यांना निस्तेज करतील,” असा मोठा गौप्यस्फोट शहाजी बापूंनी केला आहे.
विरोधक नेहमी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आरोप करतात. यावर बोलताना बापू म्हणाले, “मुंबईसाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं होतं. आता जर कुणी मुंबई तोडण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही एक लाख पाच हजार जीव द्यायला तयार आहोत,” असं म्हणत त्यांनी (Shahajibapu Patil) विरोधकांची बोलती बंद केली आहे.
बापूंचा हा आत्मविश्वास हवेत नाहीये. नुकत्याच झालेल्या सांगोला नगरपरिषद निवडणुकीत भाजप, ठाकरे गट आणि शेकाप या तिघांनी मिळून त्यांना घेरलं होतं. तरीही २० पैकी १७ जागा जिंकून बापूंनी आपला गड एकहाती राखलाय. आता सांगोल्याचा हा ‘वाघ’ मुंबईच्या जंगलात काय धुमाकूळ घालतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘ते’ काम अजित पवार करतायत, आपल्याला गरज नाही; उदय सामंतांनी भाजपला दाखवला आरसा!
- महायुतीत भूकंप! “मी फडणवीसांना आधीच सावध केलं होतं…”; अजित पवारांबाबत रवींद्र चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट
- राज ठाकरेंच्या हाती धक्कादायक पुरावे; भाजपच्या ‘बिनविरोध’ पॅटर्नची होणार पोलखोल?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












