🕒 1 min read
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधून भाजपची उमेदवारी मिळवलेल्या पूजा मोरे (Pooja More) यांनी सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे अर्ज मागे घेतला आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. आता या प्रकरणावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी पूजा मोरे आणि धनंजय जाधव यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. इतकेच नाही तर, “पूजा मोरे हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है,” असे म्हणत त्यांनी खासदार बजरंग सोनवणे आणि राजेश टोपेंनाही थेट ललकारले आहे.
Laxman Hake criticizes Pooja More
पूजा मोरे यांनी रडत रडत माघार घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. ते म्हणाले, “तुमचा पती धनंजय जाधव ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या गाडीवर दगडं मारायला निघाला होता. आज तुम्ही कमळावर निवडणूक लढवताय? काँग्रेस, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेड ते स्वराज्य पक्ष… सगळे पक्ष फिरून झाले आणि आता भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढायला निघालात? पण जनता सजग आहे. तुम्ही निवडणुकीआधीच युद्धातून पळ काढला आहे आणि पराभव स्वीकारला आहे.”
यावेळी हाकेंनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या समर्थकांना आणि नेत्यांनाही सज्जड इशारा दिला. “अती केली की माती होते. हे लोक ओबीसी नेत्यांना आणि आरक्षणाला सातत्याने टार्गेट करत होते. पूजा मोरे हा फक्त ट्रेलर आहे. खासदार बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि राजेश टोपे यांचा पिक्चर अजून बाकी आहे. आम्ही कोणालाही सोडणार नाही,” असा एल्गार हाकेंनी पुकारला आहे.
पूजा मोरे यांना मराठा आंदोलनावेळी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेमुळे भाजप कार्यकर्त्यांकडूनच प्रचंड विरोध होत होता. अखेर त्यांनी माघार घेतली, पण लक्ष्मण हाकेंच्या या विधानामुळे ओबीसी-मराठा वादाची ठिणगी पुन्हा पडल्याचे चित्र आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगेंचा ट्रोलर्सना सज्जड दम; पूजा मोरेंच्या समर्थनार्थ घेतली ‘ही’ भूमिका, म्हणाले “परिणाम भोगावे लागतील!”
- “माझ्या हातात मतं नाहीत, पण…” मनोज जरांगे पाटलांची मोठी गर्जना; महापालिका निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट!
- इनकम टॅक्सचे नियम बदलले: १२.७५ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त; पॅन-आधार लिंक नसलेल्यांना हजार रुपयांचा दंड!













