Share

संभाजीनगरमध्ये ‘हायव्होल्टेज ड्रामा’! उमेदवारी अर्जावरून अधिकाऱ्याच्या टेबलवरच खडाजंगी; व्हिडिओ तुफान व्हायरल

Viral video from Chhatrapati Sambhajinagar election office shows heated argument between candidate and officer over form.

Published On: 

High voltage drama in Sambhajinagar election office! Candidate fights with officer over rejected form. Watch viral video.

छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीचं रणधुमाळी आता रंगात येऊ लागली आहे. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्याचे प्रकार समोर येत आहेत, पण संभाजीनगरातून ( Sambhajinagar election ) एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. प्रभाग क्रमांक ३, ४ आणि ५ च्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात उमेदवारी अर्जावरून झालेला हा राडा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक उमेदवार आणि त्यांचे समर्थक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार करताना दिसत आहेत. “माझा फॉर्म का फाडला?” असा संतप्त सवाल उमेदवाराकडून विचारला जात आहे. संबंधित उमेदवार वेळेत, म्हणजे दुपारी ३ वाजेच्या आत कार्यालयात हजर झाला होता, तरीही त्याचा अर्ज का नाकारला गेला आणि तो फाडला का गेला, यावरून ही शाब्दिक चकमक उडाली आहे.

कार्यकर्त्यांचा संताप आणि अधिकाऱ्याचा संयम व्हिडिओमध्ये संतापलेले कार्यकर्ते अधिकाऱ्याला घेराव घालताना दिसतात. “एका गरिबाच्या पोटावर पाय देऊ नका,” “आम्ही हे खपवून घेणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी मात्र शांतपणे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. “उमेदवार ३ वाजल्यानंतर आले होते, त्यामुळे नियमानुसार कारवाई केली,” असा दावा अधिकाऱ्याने केला आहे. मात्र, “फॉर्म फाडला नाही,” असं स्पष्टीकरण देतानाही ते दिसत आहेत.

ही घटना प्रशासनावर आणि उमेदवारांच्या संयमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार घडल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. हा व्हिडिओ आता व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने शेअर होत असून, यावर नेटकऱ्यांच्याही उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही