Share

तिकीट कापल्याचा भडका! भागवत कराडांच्या डोळ्यादेखत भाजप महिला कार्यकर्तीने नेत्याच्या कानशिलात लगावली

Shocking video from Chhatrapati Sambhajinagar: BJP woman worker slaps a leader in front of Bhagwat Karad after being denied an election ticket.

Published On: 

BJP Woman Worker Slaps Leader in Sambhajinagar: Bhagwat Karad Video

🕒 1 min read

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी: संभाजीनगरात भाजपमधील अंतर्गत बंडाळी आता टोकाला पोहोचली आहे. तिकीट वाटपावरून सुरू असलेल्या नाराजीचा स्फोट आज थेट रस्त्यावर पाहायला मिळाला. मनपा निवडणुकीचं तिकीट न मिळाल्याने संतापलेल्या एका महिला कार्यकर्तीने चक्क एका स्थानिक नेत्याच्या सणसणीत कानशिलात लगावली. विशेष म्हणजे, हा सगळा हायव्होल्टेज ड्रामा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagwat Karad ) यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या डोळ्यादेखत घडला.

नेमकं काय घडलं?

भाजपच्या प्रचार कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. डॉ. भागवत कराड हे तिथे उपस्थित असतानाच तिकीट न मिळालेल्या नाराज गटाने त्यांना घेराव घातला. याच गर्दीत एक महिला कार्यकर्ती प्रचंड आक्रमक झालेली दिसली. संबंधित महिला गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात निष्ठेने काम करत आहे आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी त्या प्रबळ इच्छुक होत्या. मात्र, पक्षाने ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारल्याचे समजताच त्यांचा संयम सुटला.

BJP Woman Worker Slaps Leader in Sambhajinagar

संतापाच्या भरात या महिलेने तिथे उपस्थित असलेल्या एका नेत्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली आणि बघता बघता प्रकरण हातघाईवर आलं. रागाचा पारा चढलेल्या या महिलेने थेट त्या नेत्याच्या गालावर ‘प्रसाद’ देत कानाखाली आवाज काढला.

Bhagwat Karad यांची तारांबळ

हा प्रकार घडत असताना डॉ. भागवत कराड अगदी काही फुटांच्या अंतरावर होते. आपल्याच पक्षातील महिला कार्यकर्तीचा हा रौद्र अवतार पाहून तेही काही क्षण अवाक झाले. कराड यांनी मध्यस्थी करण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. “आम्ही इतकी वर्ष पक्षाची सेवा करायची आणि तुम्ही आमची तिकीटं कापायची?” असा जाब विचारत कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला.

व्हिडिओ व्हायरल, पक्षात खळबळ

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भररस्त्यात, प्रसारमाध्यमांचे कॅमेरे सुरू असताना आणि बड्या नेत्याच्या उपस्थितीत भाजपच्याच पदाधिकाऱ्याला कानशिलात खावी लागल्याने पक्षाची चांगलीच नाचक्की झाली आहे. शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपमध्ये तिकीट वाटपावरून आता ‘फ्री-स्टाईल’ हाणामारी सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही