खडकवासला धरण परिसरातील अतिक्रमणाची मंत्र्यांकडून विधिमंडळात कबुली

Encroachments on Khadakwasla Dam Land, Minister Confirms in Assembly

Published On: 

Encroachments on Khadakwasla Dam Land, Minister Confirms in Assembly

पुणे : खडकवासला धरण परिसरातील जलसंपदा विभागाच्या संपादित जमिनींवर बेकायदा बंगले, फार्म हाऊस, हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि खासगी कंपन्यांची उभारणी झाल्याची स्पष्ट कबुली जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी विधानसभेत दिली. ही माहिती त्यांनी आमदार भीमराव तापकीर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली.

तापकीर यांनी अधोरेखित केलं की, गोऱ्हे बुद्रुक, खानापूर, गोऱ्हे खुर्द आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भराव टाकून अतिक्रमण केलं गेलं आहे. यामुळे धरणाच्या जलसाठ्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असून, अतिक्रमण करणाऱ्यांकडून जलसंपदा अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासनही अतिक्रमणविरोधी कारवाईस सहकार्य करत नाही, असा आरोप त्यांनी केला.

Bungalows and hotels on Khadakwasla Dam Land

या पार्श्वभूमीवर उत्तर देताना विखे-पाटील म्हणाले की, “भराव टाकून अतिक्रमण झाल्याचं निष्पन्न झालेलं नाही. जलसंपदा विभागाच्या जागांवर अतिक्रमण नोंदवले गेले असून, संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ही अतिक्रमणं हटवण्यासाठी विभागीय यंत्रणा पुणे महापालिका, महसूल आणि गृह विभागाच्या समन्वयाने कार्यरत आहे.”

मंत्र्यांनी धरण परिसरातील आपत्कालीन रस्ते किंवा प्रवेशमार्ग अतिक्रमणामुळे बंद झाल्याचं स्पष्टपणे नाकारलं. त्यांनी हेही सांगितलं की, “खडकवासला प्रकल्पांतर्गत असलेल्या चारही धरणांच्या (खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर) सुरक्षेत कोणतीही गंभीर त्रुटी नाही. एकूण ५० सुरक्षारक्षक तैनात आहेत आणि सीसीटीव्ही यंत्रणा, पोलिस चौक्या कार्यरत आहेत.”

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही