Share

मीरा-भाईंदर मनसे मोर्चाला अखेर परवानगी; फडणवीस सरकार घाबरलं म्हणून झुकलं! मनसेचा दावा

MNS march in Mira-Bhayandar finally gets permission. Abhijit Panse states “government was scared and gave in.

Published On: 

Maharashtra does not need reservation MNS raj thackeray statment

मीरा-भाईंदर, ८ जुलै: शहरात मराठीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादात आता नवीन घडामोड समोर आली आहे. तीव्र विरोध आणि मनसे कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर, अखेर पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिली आहे. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी याला सरकार झुकल्याचं म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मीरा-भाईंदरमध्ये मराठी अस्मितेचा मुद्दा तापला आहे. परप्रांतीय व्यापाऱ्यांशी झालेल्या वादानंतर वातावरण अधिकच चिघळलं. आज मनसे आणि मराठी एकीकरण समितीने मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत, विशिष्ट मार्गावरून मोर्चा काढण्याच्या हट्टाला विरोध दर्शवला होता.

MNS Mira-Bhayandar March Allowed

मात्र, मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आपला निर्धार कायम ठेवल्याचं चित्र होतं. याच पार्श्वभूमीवर, आता मोर्चाला परवानगी मिळाल्याने मनसेने याला आपला विजय मानला आहे.

मनसे नेते अभिजीत पानसे म्हणाले, “प्रशासनाने, सरकारने हा मोर्चा येऊ नये यासाठी प्रयत्न केला. पोलिसी बळाचा वापर केला. दडपशाही केली. तरीही मराठी माणूस वाकला नाही हे पाहून ते झुकले. मोर्चाला परवानगी दिली गेली.”

स्थानिक आमदार नरेंद्र मेहतांवर निशाणा साधत पानसे म्हणाले, “एखादा आमदार मेहता आहे म्हणून काय फक्त मेहता लोकांचाच आहे की काय? सामान्य लोकांचा नाहीये का?” तसेच, “एखादा व्यापारी उठून म्हणतो की महाराष्ट्रात हिंदीच बोलणार, त्याला आमच्या लोकांनी प्रसाद दिला. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पोलीस संरक्षण देऊन परवानगी दिली जाते. पण मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाकारली जाते? हा मराठी माणूस तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. ते घाबरले म्हणून मोर्चाला परवानगी दिली,” असेही पानसे यांनी ठामपणे नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install