Share

मराठीच्या मुद्द्यावर मीरा-भाईंदरमध्ये ठिणगी! आमदारांच्या धक्कादायक वक्तव्याने खळबळ; नेमकं सत्य काय?

MNS-Marathi Ekikaran Samiti march denied permission in Mira-Bhayandar; MLA’s comments spark controversy.

Published On: 

Operation Sindoor Not the Answer to Terrorism, Says MNS Raj Thackeray Targeting Modi Government

मीरा-भाईंदर, ८ जुलै: मीरा-भाईंदर शहरात मराठी विरुद्ध अमराठी असा वाद चांगलाच पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मराठी एकीकरण समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असून, मोर्चासाठी जमलेल्या महाराष्ट्र सैनिकांना आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.

या प्रकरणात मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “मीरा-भाईंदर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मनसे व मराठी एकीकरण समितीच्या मोर्चावर पोलिसांनी कारवाई केली असेल,” असे मेहता म्हणाले.

MNS Mira-Bhayandar Marathi March Denied

काही दिवसांपूर्वी शहरात परप्रांतीयांनी मोर्चा काढला होता, ज्याला आमदार मेहता यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, मराठी मोर्चाला त्यांनी पाठिंबा न दिल्याने त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर मेहता म्हणाले, “अमराठी लोकांच्या मोर्चाचा हेतू वाईट नव्हता. मात्र, मनसेच्या मोर्चाच्या मागे काही इतर राजकीय लोक असल्याची शंका आहे. तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नाही.”

पुढे म्हणाले, “परप्रांतीयांच्या मोर्चाचा हेतू एकच आणि स्पष्ट होता, ‘आमच्या लोकांना मारलं आहे, असं भविष्यात घडू नये, त्यावर कडक कारवाई व्हावी’. एवढीच त्यांची भूमिका होती. तसेच, ते लोक एका सभागृहात संघटित झाले होते आणि कोणीही असभ्यता दाखवली नाही.”

मराठी लोकांवर संशय घेताय का? या प्रश्नावर मेहता म्हणाले, “मोर्चा कोणीही काढावा. परंतु, ते आंदोलन चालवणारा वेगळा असेल, तर पोलिसांना दखल द्यावी लागते. मी फक्त माझं मत सांगतोय. मनसेच्या आंदोलनाचा मार्ग देखील संशयास्पद होता. त्यामुळे काही धोका निर्माण होईल, असं पोलिसांना वाटलं असेल. ते भाजपा कार्यालयावरही मोर्चा काढणार होते. भाजपा कार्यकर्ते व ते लोक समोरासमोर आले असते, तर काय झालं असतं? त्यांनी सरकारी कार्यालयावर मोर्चा काढायला हवा होता.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install