Share

गृहमंत्री फडणवीसांच्या कार्यकाळात आमदाराच्या हत्येचा कट! SIT चौकशीचे आदेश, सूत्रधाराचा शोध सुरू

7 criminals arrested in murder plot against MLA Sunil Shelke, arms seized in Pune.

Published On: 

MLA Sunil Shelke's murder plot foiled; 7 arrested with 9 pistols, SIT ordered.

पिंपरी-चिंचवड | मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उधळण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सात सराईत गुन्हेगारांना अटक करत पोलिसांनी ९ पिस्तुलं, ४२ जिवंत काडतुसे आणि कोयत्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. गृहमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात आमदाराच्या हत्येचा कट रचला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या कटाचा खुलासा स्वतः आमदार शेळके ( Sunil Shelke ) यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत केला. त्यांनी आरोप केला की, ही टोळी त्यांच्या जीवावर उठली होती आणि त्यामागे कोणीतरी ‘शक्तिशाली सूत्रधार’ असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश तातडीने दिले.

MLA Shelke Murder Plot Foiled

२६ जुलै २०२३ रोजी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडाविरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तळेगाव दाभाडे परिसरात कारवाई करण्यात आली. सुरुवातीला दोन गुन्हेगार पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पुढे जात सात जणांना अटक करण्यात आले.

या टोळीवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जाळपोळ, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, लूट, तोडफोड यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रं कुठून आली आणि खर्चासाठी लागणारी आर्थिक मदत कुणी केली, हा मोठा प्रश्न आहे. शेळके ( Sunil Shelke ) यांनी याच मुद्द्यावर विधानसभेत आवाज उठवला आणि सांगितले की, गरीब पार्श्वभूमीतून आलेल्या या टोळीने लाखो रुपये खर्चून पिस्तुलं आणि नामवंत वकिलांची फी भरली, ही बाब संशयास्पद आहे.

अटक केलेले गुन्हेगार मध्यप्रदेश, जालना, वडगाव आणि काळेवाडी परिसरातील आहेत. त्यांना शस्त्र पुरवणारा ‘देवराज’ नावाचा मध्यप्रदेशातील व्यक्ती असल्याची माहिती समोर आली असून, त्याची माहिती संबंधित राज्य सरकारला देण्यात आली आहे.

हे आरोपी जामिनावर सुटल्यावर तडीपार होते, तरीही पुणे जिल्ह्यात वावरत होते, हे पोलिस यंत्रणेसाठी मोठं अपयश आहे. आता या कटामागचं संपूर्ण जाळं उघड करण्यासाठी विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही