Share

हिंदीचा आम्हाला अभिमान; इंग्रजीला पायघड्या घालणारे आम्ही नाहीत – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis slams Uddhav Thackeray over ‘fake narratives’ and triple language formula.

Published On: 

Devendra Fadnavis fiercely counters Uddhav Thackeray on 'fake narratives' and reveals Thackeray's govt report on compulsory Hindi.

मुंबई, महाराष्ट्र: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्रिभाषा सूत्रावरून सुरू झालेल्या वादाला आता फडणवीसांच्या नव्या वक्तव्याने आणखी धार चढली आहे. हिंदी भाषेच्या सक्तीबाबतचे दोन शासन निर्णय मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भाजपला ‘अफवांची फॅक्टरी’ असं म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) ठाकरेंवर थेट हल्ला चढवला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “फेक नरेटिव्ह तयार करणारी फॅक्टरी अजून थांबलेली नाही. लोकसभेला फेक नरेटिव्हच्या मदतीने यांनी एक यश मिळवलं, पण विधानसभेला आपण त्यांना थेट नरेटिव्हने उत्तर दिलं.” यातून त्यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.

Devendra Fadnavis slams Uddhav Thackeray

त्रिभाषा सूत्रावरून सुरु असलेल्या चर्चेत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या पूर्वीच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश टाकत त्यांना अडचणीत आणलं. “मला तर लक्षात येत नाही यांना लाज कशी वाटत नाही? आपण जे केलं त्याच्याच विरोधात बोलायचं आणि जिंकलो जिंकलो सांगायचं.”

ते पुढे म्हणाले, “देशात त्रिभाषा सूत्र आल्यानंतर ते सूत्र कसं स्वीकारलं पाहिजे यासाठी उद्धव ठाकरेंच्या सरकारने समिती तयार केली होती. त्या समितीचा अहवाल आला. त्यात स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की, पहिली ते बारावी हिंदी अनिवार्य करा. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरेंनी नेमलेल्या याच समितीने हे सांगितलं आणि तो अहवाल उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटने स्वीकारला, त्यावर उद्धव ठाकरेंनी स्वतः सही केली होती.”

“आमच्या सरकारने हिंदी किंवा कुठलीही भाषा शिकता येईल, तेव्हा यांनी हिंदी सक्तीचं बोलणं सुरु केलं. मराठीची सक्ती फक्त महाराष्ट्रात आहे, पण आम्हाला हिंदीचा अभिमान आहे. भारतातल्या प्रत्येक भाषेचा आम्हाला अभिमान आहे. हिंदीचा विरोध करुन इंग्रजीला पायघड्या घालणारे आम्ही नाहीत. बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, हे आम्ही सहन करणार नाही. आम्ही समिती तयार केली आहे आणि मराठी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्हीच घेऊ. कुणाच्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही,” असं ठामपणे फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी सांगितलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही