🕒 1 min read
बर्मिंगहॅम: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लिश संघाने १-० अशी आघाडी घेतली असून, त्यांनी पहिल्या कसोटीत भारताचा ५ विकेट्सने पराभव केला आहे. या विजयानंतर आता दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात सर्वात मोठी बातमी म्हणजे, इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer ) तब्बल ४ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये परतला आहे!
लीड्स कसोटीतील विजयानंतर अवघ्या दोनच दिवसांत इंग्लंडने हा संघ जाहीर केला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली असली तरी, त्यांच्या गोलंदाजी विभागात अनुभवी गोलंदाजांची कमतरता स्पष्टपणे जाणवली होती. त्यामुळे, आता आर्चरचे पुनरागमन संघासाठी मोठा दिलासा देणारे मानले जात आहे.
Jofra Archer Returns to England Test Squad vs India
गेल्या ४-५ वर्षांपासून दुखापतींशी संघर्ष करत असलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer ) २ जुलैपासून एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. लीड्स कसोटीतील संघातून कोणत्याही खेळाडूला वगळण्यात आलेले नाही, फक्त आर्चरला अतिरिक्त म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आर्चर ४ वर्षांहून अधिक काळानंतर कसोटी क्रिकेटमध्ये परतत आहे. त्याने आपल्या १३ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत ४२ विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, आर्चरने आपला शेवटचा कसोटी सामना फेब्रुवारी २०२१ मध्ये भारताविरुद्धच खेळला होता. त्यानंतर त्याला दुखापत झाली आणि वेगवेगळ्या दुखापतींची मालिका सुरूच राहिली, ज्यामुळे तो कसोटी संघात परत येऊ शकला नव्हता.
भारताचा दुसरा कसोटी सामना २ जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात आता इंग्लंडच्या गोलंदाजी विभागात जोफ्रा आर्चरच्या समावेशामुळे सामन्याची रंगत आणखी वाढणार आहे. लीड्स कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये भारतीय फलंदाजांनी, विशेषतः टॉप आणि मिडल ऑर्डरने, मोठी धावसंख्या उभारली होती.
IND vs ENG 2nd Test England Squad Announced
बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.
📌 महत्वाच्या बातम्या
- देश माझ्या लेकीपेक्षा महत्त्वाचा; इंग्लंड दौऱ्यापूर्वी केएल राहुलचा टीम इंडियासाठी मोठा त्याग, प्रशिक्षकांनी केला खुलासा
- “पुन्हा योग्य मार्गावर ये…” मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पृथ्वी शॉची केली कानउघडणी
- भारतीय महिला संघाचे इंग्लंडविरुद्ध विजयी सलामीचे लक्ष्य; आजपासून ट्वेन्टी२० मालिकेला सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












