🕒 1 min read
ठाणे | प्रतिनिधी: डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उद्या सायंकाळी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाण्यातील नेहरू नगर भागात संध्याकाळी ५ वाजता पक्षप्रवेश सोहळा होणार असून, यावेळी चंद्रहार पाटील ( Chandrahar Patil ) मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहेत. तब्बल ५ ते ७ हजार कार्यकर्त्यांसह ते पक्षप्रवेश करणार आहेत.
या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, धैर्यशील माने, मंत्री उदय सामंत, संजय शिरसाट, शंभूराज देसाई, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक व आमदार सुहास बाबर उपस्थित राहणार आहेत. पक्षात प्रवेश केल्यानंतर चंद्रहार पाटलांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याचेही समजते.
Chandrahar Patil to join Shinde Shiv Sena
या घडामोडींमुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय संदेश जात आहे. कारण, चंद्रहार पाटलांना सांगली मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिली होती. मात्र, तेथे त्यांना फक्त ५५ हजार मते मिळाली होती, तर अपक्ष म्हणून उभे असलेल्या काँग्रेसचे विशाल पाटील यांनी तब्बल ५.६९ लाख मते मिळवत मोठा विजय मिळवला होता.
दरम्यान, चंद्रहार पाटलांनी सोशल मीडियावरून आपल्या निर्णयाची माहिती दिली. “क्रीडा क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी थेट प्रशासनाशी जोडणं आवश्यक आहे,” असं त्यांनी नमूद केलं. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला नवा सूर मिळाला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- तर ठाकरे बंधू स्वार्थासाठी एकत्र येतायेत; दीपाली सय्यद यांचा मोठा आरोप
- उठले तर लवंग, बसले तर विलायची! नितेश राणेंवर प्रकाश महाजनांची फटकेबाजी
- महाराष्ट्र निवडणुका फिक्स होत्या – राहुल गांधींचा गंभीर आरोप













