Share

भाजप नेत्याचे हायवेवर गर्लफ्रेंडसोबत अश्लील गैरकृत्य; शिक्षा मात्र देखरेख करणाऱ्या ३ कर्मचाऱ्यांना!

BJP leader caught on CCTV having sex on highway; 3 night shift employees suspended after video goes viral.

Published On: 

BJP leader caught on CCTV having sex on highway; 3 night shift employees suspended after video goes viral.

मुंबई – मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील भाजप नेते मनोहरलाल धाकड पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एका तरुणीसोबत अश्लील गैरकृत्य करतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. ही घटना 13 मे रोजी घडली होती.

या घटनेनंतर महामार्गाची देखभाल करणाऱ्या खासगी कंपनीने नाईट शिफ्टमध्ये कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. हे कर्मचारी MKC Infrastructure Ltd. या कंपनीशी संबंधित आहेत, जी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत (NHAI) कंत्राटावर काम करते.

BJP Leader Manohar Lal Dhakad’s Highway Sex Video

या तिघांवर व्हिडीओ व्हायरल करण्याचा आरोप असून त्यांनी मनोहरलाल धाकडकडे व्हिडीओ डिलिट करण्यासाठी एक लाखाची मागणी केल्याचंही समोर आलं आहे. यामध्ये धाकडने 20 हजार रुपये दिल्यानंतरही व्हिडीओ व्हायरल झाला.

सध्या या कर्मचाऱ्यांना फक्त निलंबित करण्यात आलं आहे.  या प्रकरणात जर गरज पडली तर या तिघांनाही चौकसीसाठी बोलवण्यात येईल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी मनोहरलाल धाकडला अटक केली होती, मात्र त्याला नंतर जामिनावर सोडण्यात आलं. त्याच्यासोबत असलेल्या तरुणीविषयीही चौकशी सुरू आहे. धाकडची पत्नी ही मंदसौर जिल्हा पंचायत सदस्य असून भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आली आहे. या घटनेमुळे भाजपवर पुन्हा एकदा नैतिकतेच्या मुद्द्यावरून टीकेचा भडिमार होतोय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही