Share

नागरिकांनो घरातच थांबा, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट

IMD (rain alert) issues red alert for Mumbai, Thane, Raigad, Ratnagiri, and Sindhudurg due to heavy rain forecast. Citizens advised to stay indoors and follow safety measures.

Published On: 

Monsoon in Kerala - Dark monsoon clouds and rain in Indian coastal region.

🕒 1 min read

राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाची (rain alert) नोंद झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

मुंबईत पावसामुळे वाहतूक ठप्प

रविवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. रेल्वेसेवेवरही याचा परिणाम जाणवतो आहे. हवामान खात्यानुसार, पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Citizens, stay at home, Meteorological Department issues red alert for these districts

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

27 आणि 28 मे रोजी रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 27 मे रोजी रेड अलर्ट दिला गेला आहे. पुढील चार दिवस या भागांत अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्रशासन सज्ज, नागरिकांनी खबरदारी घ्यावी

संबंधित जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आलं असून नागरिकांनी नद्या, नाल्यांच्या काठावर जाणं टाळावं, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही