Share

“रुपाली चाकणकरांच्या योग्यतेवर नीलम गोऱ्हेंचा प्रश्न – महिला आयोगाने योग्य पावले उचलली असती तर…!”

Neelam Gorhe questions the effectiveness of the State Women’s Commission. Says Mayuri could’ve got property rights if legal advice was given properly.

Published On: 

Neelam Gorhe questions the effectiveness of the State Women's Commission. Says Mayuri could’ve got property rights if legal advice was given properly.

🕒 1 min read

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित होत असताना, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी थेट महिला आयोगावरच गंभीर टिप्पणी केली आहे. त्यांनी पीडित वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, “जर राज्य महिला आयोगाने मयुरी जगतापच्या प्रकरणात ‘कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा’ अंतर्गत कार्यवाही केली असती, तर तिला तिच्या सासरच्या मालमत्तेत वाटा मिळाला असता.”

नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट सांगितले की, महिला आयोगाकडे सध्या सदस्यांची नेमणूक नाही, आणि अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये नियमित बैठकांसह, सामाजिक संस्थांचा सहभाग आवश्यक आहे. त्यांनी म्हटले की, “सध्याच्या महिला आयोगाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. जर अध्यक्ष सक्षम नसतील, तर इतर अनुभवसंपन्न व्यक्तींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.”

Neelam Gorhe Slams Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांवर अप्रत्यक्ष टीका करत, गोऱ्हे म्हणाल्या की, “मीडिया ट्रायलपेक्षा कायद्यानुसार पीडित महिलांना मदत करणं गरजेचं आहे.” त्यांनी नाशिकमधील दुसऱ्या आत्महत्येचा उल्लेख करत सांगितले की, अनेक पोलीस ठाण्यांवर बाहुबलींचं वर्चस्व आहे आणि संवेदनशीलता अभावानेच दिसते. तरी संपूर्ण पोलीस दलावर टीका करून त्यांचं नैतिक बल खच्ची करणं योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!