🕒 1 min read
बीड – पुण्यात वाढणाऱ्या गुन्हेगारीवरून करुणा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. “जे पुण्यात गुन्हे थांबवू शकले नाहीत, ते बीडमध्ये काय थांबवणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मंत्रीपदाविषयी बोलताना त्यांनी थेट मागणी केली की, “धनंजय मुंडेंकडून काढलेले मंत्रीपद बीडमधील इतर आमदाराला द्यावे. अन्यथा मी पुन्हा लढा उभारेल.”
Karuna Munde slams Ajit Pawar on Pune crime
करुणा मुंडे यांनी आरोप केला की, बीडमध्ये सध्या गुन्हेगारी टोळक्यांचे राज्य आहे आणि त्यामागे पंकजा आणि धनंजय मुंडे यांचा हात आहे. “संपूर्ण जिल्ह्यात आठ ते दहा हजार गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना राजकीय पाठबळ दिलं जातंय. पंकजा आणि धनंजय हे दोघंही एका माळेचे मणी आहेत, त्यांनी बीडकरांना गुंडांच्या हवाली केलं आहे,” असे त्यांनी म्हटले.
📌 महत्वाच्या बातम्या
- गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा पंकजा – धनंजय मुंडेंवर थेट आरोप; ‘बीडमध्ये ऑपरेशन सिंदूर चालवा’- करुणा मुंडे
- मनोज जरांगे यांच्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान, आरक्षण गमावलं – गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप
- संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड न्यायालयात सुनावणी; धनंजय देशमुख म्हणाले..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












