Share

सपकाळ-ठाकरे भेटीमुळे हालचालींना वेग; “तोपर्यंत महाविकास आघाडी कायम”

Maharashtra Congress President Harshvardhan Sapkal met Uddhav Thackeray. They discussed “Maharashtra Dharma”, democracy, and election strategy. Sapkal said, “MVA is still united to save democracy.”

Published On: 

Uddhav Thackeray

🕒 1 min read

मुंबई: राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा सूर लागण्याआधीच महाविकास आघाडीत राजकीय हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र धर्म, लोकशाहीच्या रक्षणासाठीचा लढा आणि आगामी निवडणुकांसाठीची भूमिका यावर सखोल चर्चा झाली.

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, “महाविकास आघाडी आजही अस्तित्वात आहे. देशातील लोकशाही आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.” तसेच, स्थानिक निवडणुकांचा निर्णय हा निवडणुकांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर स्थानिक पातळीवरच घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Harshwardhan Sapkal met Uddhav Thackeray

याचप्रमाणे, भाजपवर टीका करताना त्यांनी म्हटलं की, “भाजप देश आणि धर्म दोन्ही बुडवतोय. त्यामुळे एकत्र लढणं ही काळाची गरज आहे.” सपकाळ यांनी लिहिलेलं राहुल गांधींवरील पुस्तक देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना भेट दिलं.

या भेटीनंतर महाविकास आघाडीत नवा समन्वय निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, या आघाडीत शरद पवार गट काय भूमिका घेणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही