“हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली उंची…”; मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचा Chandrashekhar Bawankule यांच्याकडून समाचार

Chandrashekhar Bawankule criticized harshvardhan sapkal over his statement about devendra fadanvis.

Published On: 

Chandrashekhar Bawankule criticized harshvardhan sapkal over his statement about devendra fadanvis

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः घेतलेले निर्णयही अंमलात आणू शकत नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Chandrashekhar Bawankule Criticized Harshvardhan Sapkal 

“राज्यात संस्कृती आहे आपण धर्मासाठी समर्पित आहोत, त्यांनी आजच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या टीका करणे म्हणजे सुर्याला दिवा दाखवण्यासारख आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली उंची तपासून पहावे, नंतर फडणवीसांवर बोललं पाहिजे”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

काय म्हणाले होते हर्षवर्धन सपकाळ?

“भाजपा युतीच्या नेत्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः घेतलेले निर्णयही अंमलात आणू शकत नाहीत. १ एप्रिल पासून वीजबील १० टक्के कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ मार्च रोजी केली पण १ एप्रिलला महावितरणमार्फत वीज नियामक आयोगात याचिका दाखल करून दर कपातीला स्थगिती मिळवून जनतेला एप्रिल फुल केले”, असा हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही