🕒 1 min read
Sushma Andhare | दोन दिवसांपूर्वी प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने दहा लाख रुपयांची मागणी केली. पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला. मात्र, त्या दोन चिमुकल्या जीवांना वाचवण्यात यश आलं.
Sushma Andhare On Tanisha Bhise Case
ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून याबाबात संताप व्यक्त करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्य सरकारने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला वार्षिक फक्त 1 रुपये भाड्याने जागा दिली आहे, असा गंभीर दावा केला आहे. सुषमा अंधारे यांनी 18 फेब्रुवारी 2025 रोजी घेतलेल्या मंत्रिमंडळ निर्णयांचा एक फोटो एक्सवर अपलोड केला आहे.
या फोटोमध्ये खाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आले, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशन हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटरला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन नाममात्र दराने वार्षिक भाडेपट्ट्याने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या ट्रस्टला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसाठी मौ. एरंडवणा येथे जमीन देण्यात आली आहे, असे सुषमा अंधारे यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Anjali Damania यांच्याकडून बीडमधील आणखी एका प्रकरणाची पोलखोल; म्हणाल्या “बोबडे कुटुंब…”
- Yogesh Kadam यांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट; भेटीनंतर केली ‘ही’ मागणी
- संजय राऊतांनी ‘माझ्या नादी लागू नको, Xगडा करीन’ म्हणताच Praful Patel म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












