Share

सलमान खानचा Sikandar बॉक्स ऑफिसवर जोरात आपटणार? समोर आली महत्त्वाची अपडेट

Will Salman Khan film Sikandar make a splash at the box office on the first day or will the film be a huge hit on the first day? The question that has been raised by fans is whether it will be a blockbuster on the first day itself.

by MHD

Published On: 

Sikandar Release Date Announcement

🕒 1 min read

Sikandar । बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) सिकंदर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. अशातच आता या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.

अगोदर हा चित्रपट आधी 28 मार्च म्हणजे शुक्रवारी रिलीज होणार होता. पण आता या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये (Sikander movie release date) मोठा बदल करण्यात आला आहे. सिकंदर हा चित्रपट आता 30 मार्च म्हणजेच रविवारी रिलीज केला जाणार आहे.

याबाबत स्वतः सलमान खानने खास पोस्टर शेअर करत माहिती दिली आहे. त्यामुळे सलमान खानचा हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार की पहिल्याच दिवशी चित्रपट जोरात आपटणार? असा सवाल चाहत्यांना पडला आहे.

या चित्रपटाला लाँग वीकेंडची कमाई करता येणार नाही आहे. कोणतेही चित्रपट शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी सर्वात जास्त पाहिले जातात. पण हा चित्रपट रविवारी रिलीज होत असल्याने सलमान खानने सगळ्यात मोठी रिस्क घेतली आहे, असे बोलले जात आहे.

Sikandar film actor

दरम्यान, सिकंदर या चित्रपटात सलमान खान सोबत साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) मुख्य भूमिकेत असणार आहे. पहिल्यांदाच सलमान खान आणि रश्मिका मंदाना ही जोडी पाहायला मिळत आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना आवडते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही