Share

IPL मध्ये फक्त खेळाडूच नाही तर अंपायरदेखील होतात मालामाल, किती मिळतो पगार? जाणून घ्या

In the IPL auction, teams have spent crores of rupees to buy many players into their teams. So, how much is the salary of an umpire? Many have wondered.

by MHD

Published On: 

Umpire Salary in IPL

🕒 1 min read

IPL । इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) अर्थात आयपीएलचा (IPL 2025) थरार पुन्हा एकदा 22 मार्चपासून रंगणार आहे. सर्व संघांनी सराव सामने देखील खेळायला सुरुवात केली आहे. या सीजनमध्ये 10 संघांमध्ये एकूण 74 सामने होणार आहेत.

नोव्हेंबर महिन्यामध्ये आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन पार पडले होते. या ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंना संघांनी कोट्यवधी रुपये खर्च करून त्यांना आपल्या संघात खरेदी केले आहेत. अशातच अंपायरचा पगार (Umpire Salary) किती असतो? असा सवाल अनेकांना पडला आहे.

कारण क्रिकेटमध्ये खेळाडू जितके महत्वाचे असतात तितकेच अंपायरला सुद्धा महत्त्वाचे असतात. खरंतर खेळाडूंप्रमाणेच आयपीएलचे अंपायर देखील मालामाल होतात. आयपीएलच्या सुरुवातीला ग्रुप राउंडचे सामने होतात. (Umpire Salary in IPL 2025)

त्यानंतर प्लेऑफ सामने होतात आणि त्यानंतर फायनल सामना होतो. अंपायरला लीग सामन्यासाठी 4 हजार डॉलर मिळतात, म्हणजेच जे भारतीय रुपयांमध्ये जवळपास 3 लाख 46 हजार रुपये इतके होतात. प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येकी दोन मैदानी अंपायर असतात.

IPL Umpire Salary

आयपीएलमध्ये एकूण 70 लीग सामने खेळवले जात असून प्लेऑफ सामन्यात अंपायरला 6 हजार डॉलर म्हणजे 5 लाख 20 हजार रुपये मिळतात. फायनल सामन्यात अंपायरला जवळपास 8 हजार डॉलर म्हणजेच 6 लाख 94 हजार रुपये पगार मिळतो. तसेच यंदा अनिल चौधरी, नितीन मेनन, ब्रूस ऑक्सेनफोर्ड, ख्रिस गॅफनी, केएन अनंतपद्मनाभन आणि रॉड टकर हे अंपायर अंपायरिंग करतील.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!