Dhananjay Munde । मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder case) हत्याप्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टर माईंड आहे असा आरोप केला जात आहे. तसंच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते आहे.
या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, खासदार बजरंग सोनावणे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट होऊन सव्वा तास चर्चा झाली. पण ही भेट नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी आहे, असं धनंजय मुंडे यांनी माध्यमांना सांगितलं. आपल्याला मिळालेल्या खात्याचा अहवाल आपण अजितदादांसमोर ठेवला असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच या चर्चेमध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या :
- “छगन भुजबळांची ‘ती’ भूमिका मला पटली नाही”; Vijay Wadettiwar स्पष्टच बोलले
- ‘त्या’ आरोपींचा पाय आणखी खोलात, Santosh Deshmukh हत्याप्रकरणी लागणार मोक्का?
- राजकीय हालचालींना वेग! Dhananjay Munde देणार राजीनामा? बंद दाराआड अजितदादांशी चर्चा सुरु
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








