Share

Manoj Jarange Patil | “…तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही”; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा 

देशमुख कुटुंबाला त्रास झाला आणि धनंजय मुंडे हत्या प्रकरणात सापडले तर त्यांना रस्त्यावर देखील फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी दिला आहे.

Published On: 

Manoj Jarange Patil | "…तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही", मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा 

Manoj Jarange Patil ।  संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार 3 आरोपींपैकी पोलिसांना 2 आरोपींना पकडण्यात यश आले आहे. तर 1 आरोपी अजूनही फरार आहे. डॉ. संभाजी वायबसेच्या कसून चौकशीनंतरच आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज परभणीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात बोलताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंना थेट इशारा दिला आहे.

देशमुख कुटुंबाला त्रास झाला आणि धनंजय मुंडे हत्या प्रकरणात सापडले तर त्यांना रस्त्यावर देखील फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी दिला आहे. सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. “संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारलं तो जातीयवाद नाही का? आमचे लोक मारून तुमचे आरोपी लपून ठेवा. यापुढे जर हल्ला झाला तर उत्तर जशाचं तसं उत्तर द्या,  न्याय आरक्षण मागितलं की आम्ही जातीयवादी? “,असे परखड सवालही जरांगेंनी केले.

“आता एक काम सरकारकडून होणं गरजेचं आहे. खंडणीच्या आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. सरकारने यात अजिबात हयगय करु नये. कारण यामध्ये मोठं रॅकेट आहे. पुण्यातून सगळ्यांना पकडलं जातय याचा अर्थ सरकार आणि सरकारमधील मंत्र्याच प्रचंड राजकीय पाठबळ आहे. यांना कोण संभाळतय, त्यांना सुद्धा सरकारने अटक करावी” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

“यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही मॅटर दाबू देणार नाही”

हे प्रकरण थंड करुन दाबण्याचा प्रयत्न होतोय का? यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “यांच्या बापाला थंड होत नाही. यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही मॅटर दाबू देणार नाही. गृहमंत्रालयाला एकच सांगणं आहे की, लपवून ठेवणाऱ्यांना सुद्धा सोडू नका. ते सुद्धा खुनाला जबाबदार आहेत. लेकरु गेलं याचं दु:खच नाही. गुन्हेगारांना लपवून ठेवणं ही भूमिका चांगली नाही.”

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही