Share

Devendra Fadanvis | ना बीड ना नागपूर? कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हवं?; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर भाष्य केलं.

Published On: 

Devendra Fadanvis | ना बीड ना नागपूर? कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हवं?; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadanvis । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी वाढत्या सायबर गुन्हेगारीबद्दल सुद्धा ते बोलले. “आता सर्व माहिती व्हॉट्सअपला मागता येते. त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे की, नुसता गुन्हा करणारा गुन्हेगार नाही, तर अशा गोष्टी फॉरवर्ड केल्याने आपण सहगुन्हेगार होतो,” असं ते म्हणाले.

यावेळी त्यांना पालकमंत्रीपदाबाबत तिन्ही पक्षांमधल्या आमदारांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांबाबत विचारणा केली असता त्याबाबतचा निर्णय तिन्ही पक्ष मिळून घेतील, असं त्यांनी म्हंटल आहे. पत्रकार परिषदेत बोलताना पुढे म्हणाले की, “पालकमंत्र्याच्या संदर्भात आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल.”

पुढे फडणवीस म्हणाले, “त्यांनी मला बीडला जायला सांगितलं तर मी बीड ला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात. पण माझी स्वतःची इच्छा आहे, गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो, अर्थात या तीन नेत्यांनी मान्यता दिली तरच मी ते ठेवेन.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही