🕒 1 min read
Bachchu Kadu Sharad Pawar | दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शुक्रवारी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केले त्यानंतर त्यांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेतली. सत्तेत असूनही प्रश्न सुटत नसल्याने बच्चू कडू महायुतीला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील तीन पक्षाच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांचे विविध प्रश्नांवरून एक एकमेकांसोबत जोरदार खटके उडत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्यातच बच्चू कडू यांनी पवारांमधील भेट राज्यात चर्चेचा विषय झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबावतंत्र वापरून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
Bachchu Kadu first reaction on Meets Sharad Pawar in Pune
यावर आता बच्चू कडू यांनी पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले,” झेंडा नाहीतर अजेंडा महत्वाचा आहे. जाती धर्माचा जसा मुद्दा होतो तसा शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग यांचे मुद्दे राजकारणात चर्चेला आले पाहीजे. करीता आज पुणे येथे खा. शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतली असल्याचे कडू यांनी सांगितले.
सरकारला कोंडीत पकडण्याकरता आणि सरकार विरोधी वातावरण बघता बच्चू कडू महाविकास आघाडीत येऊ शकतात. कडू जर महाविकास आघाडीकडे गेले तर आगामी निवडणुकीत महायुतीची प्रचारात मोठी डोकेदुखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बच्चू कडू आता नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- बच्चू कडू शरद पवारांच्या भेटीला; महायुतीला करणार जय महाराष्ट्र ?
- छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र भाजपा युती सरकारने गुजरातला गहाण ठेवला
- बीड । राज ठाकरे यांची गाडी अडवून, सुपाऱ्या फेकल्या; मनसे कार्यकर्ते आणि मराठा आंदोलकात मोठा गोंधळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












