Share

बच्चू कडू शरद पवारांच्या भेटीला; महायुतीला करणार जय महाराष्ट्र ?

Bachchu Kadu Sharad Pawar | सत्तेत असूनही प्रश्न सुटत नसल्याने बच्चू कडू महायुतीला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

Published On: 

Bachchu Kadu Sharad Pawar Pune

पुणे :  राजेभाऊ मोगल | Bachchu Kadu Sharad Pawar | दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी सत्तेत सहभागी असतानाही आपल्याच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शुक्रवारी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केल्यानंतर शनिवारी सकाळीच ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. सत्तेत असूनही प्रश्न सुटत नसल्याने बच्चू कडू महायुतीला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील तीन पक्षाच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांचे विविध प्रश्नांवरून एक एकमेकांसोबत जोरदार खटके उडत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. सत्तेत सहभागी असूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगाच्या प्रश्नावर शुक्रवारी (ता.९) छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक इथून भव्य असा मोर्चा काढला.

या मोर्चा राज्यातील कानाकोपऱ्यातून दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून बच्चू कडू यांनी शहराची कोंडी करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या आंदोलनाकडे लक्ष वेधून घेतले. मात्र, केवळ यावर समाधान न मानता शनिवारी सकाळीच ते पुणे येथे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

Bachchu Kadu Meets Sharad Pawar in Pune

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. आपले नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते इतर पक्षात प्रवेश करू नये, ही काळजी सत्ताधाऱ्यांकडून घेतली जात असतानाच बच्चू कडू शरद पवारांच्या भेटीला गेल्याने महायुतीला ते धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. बच्चू कडू यांची सामान्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे नेते असल्याची ओळख आहे.

बच्चू कडू जर महाविकास आघाडीकडे गेले तर आगामी निवडणुकीत महायुतीची प्रचारात मोठी डोकेदुखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बच्चू कडू आता नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही