पत्रकारांस जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : आमच्या विरोधात बातमी का लावलीस असे म्हणत ‘महाराष्ट्र देशा’ या नामांकित न्यूज पोर्टलच्या पत्रकारास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपच्या तीन नेत्यांवर पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जनतेचा कौल लक्षात घेऊन तसेच जनतेसोबत बोलून विशेष म्हणजे भाजपच्या अंतर्गत गोटात काय हालचाली आहेत, हे जाणून घेत १२ मे २०२४ … Read more

Published On: 

छत्रपती संभाजीनगर : आमच्या विरोधात बातमी का लावलीस असे म्हणत ‘महाराष्ट्र देशा’ या नामांकित न्यूज पोर्टलच्या पत्रकारास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपच्या तीन नेत्यांवर पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जनतेचा कौल लक्षात घेऊन तसेच जनतेसोबत बोलून विशेष म्हणजे भाजपच्या अंतर्गत गोटात काय हालचाली आहेत, हे जाणून घेत १२ मे २०२४ रोजी महाराष्ट्र देशा या वेब न्यूज पोर्टलवर ‘संदीपान भुमरेंना मोठा झटका? जलील निवडून येणार असेल तर खैरेंना मदत‘?

या आशयाखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महायुतीमध्ये खळबळ माजली. वास्तव समोर आणल्याने भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, भाजपा अनुसूचित मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर शेंडगे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये आदींनी फोनकरून आमच्या विरोधात बातमी लावतो का? असे म्हणत ‘महाराष्ट्र देशा’च्या पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामागे मोठे षडयंत्र असल्याचे पत्रकारांनी सांगितले.

सदरिल व्यक्तीपासून माझ्या जीवितास धोका आहे, अशी तक्रार पत्रकाराने पुणे येथील हिंजवडी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड मध्ये भादंवी कलम ५०७ प्रमाणे वरती नमूद तिन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोग, दिल्ली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार यांच्याकडेही पाठविण्यात आले आहे.

भाजपचा तुम्हाला पाठिंबा आहे का? खैरे म्हणाले शिस्तबद्ध पक्ष दारूवाल्याला, गद्दाराला मतदान नाही करणार

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही