Share

शिरूर मतदारसंघात शिवाजीराव आढळरावांना विरोध वाढला; धक्कादायक निकालाची नोंद होणार

टीम महाराष्ट्र देशा । शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार अमोल कोल्हे ( शरद पवार गट ) विरुद्ध शिवाजीराव आढळराव-पाटील ( अजित पवार गट ) यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. एकनाथ शिंदे गटाकडून राष्ट्रवादीत ( अजित पवार गट ) आलेले आढळरावांना शिरूर मतदारसंघात विरोध वाढला आहे. सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप आढळराव यांच्यावर होत आहे. सत्तेचा … Read more

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा । शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार अमोल कोल्हे ( शरद पवार गट ) विरुद्ध शिवाजीराव आढळराव-पाटील ( अजित पवार गट ) यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. एकनाथ शिंदे गटाकडून राष्ट्रवादीत ( अजित पवार गट ) आलेले आढळरावांना शिरूर मतदारसंघात विरोध वाढला आहे. सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप आढळराव यांच्यावर होत आहे.

सत्तेचा गैरवापर करुन शिरुर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सत्तेचा वापर करुन लोकांना दडपून टाकण्याचा प्रयत्न आढळराव करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

करंदी गावात आढळराव (Shivajirao Adhalrao) पाटलांची सभा होती, मात्र या सभेच्या आधी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे सभेच्या ठिकाणी जाऊ नका नाहीतर पोलीस कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिल्याचा आरोप ग्रामस्थ बबन ढोकले यांनी केला आहे.

या प्रकारानंतर सत्तेच्या गैरवापराबद्दल शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव यांच्याविरोधात नागरिक आक्रमक झाले आहे. लोकसभा निवडणुकीत लोकशाही मार्गाने शिवाजीराव आढळराव (Shivajirao Adhalrao) यांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया शिरूर लोकसभा मतदार संघातील लोक देत आहेत. त्यामुळे निकाल काय लागणार याकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून आढळराव हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले होते. राज्यात शिंदे गटाला लोकांकडून ‘गद्दार’ म्हणून संबोधले जात आहे. त्यातच शिरूर ची जागा अजित पवार गटाला सुटल्याने आढळराव यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. ज्या राष्ट्रवादीवर आयुष्यभर टीका केली त्याच राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्याची नामुष्की आढळराव पाटील यांच्यावर आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही