Share

खेकडामंत्री लयंच बोलायला लागलाय; ओमराजे निंबाळकर यांची तानाजी सावंतांवर टीका

तानाजी सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर बार्शी येथील सभेत ‘माझा बाप मारला,माझा बाप मारला’, म्हातारा झाला तरी मडपीक 15 वर्षे घेणार का अशी टीका केली होती. आता ओमराजे निंबाळकर यांनी ‘खेकडामंञी’ ‘बायलर कोंबडी’ ‘अंडा’ आणि ‘जर्सी गाय’ असे म्हणत टीका केली आहे. ओमराजे निंबाळकर (omraje nimbalkar) म्हणाले, ”आजपर्यंतच्या निवडणुकीच्या भाषणात एकदाही स्व.पवनराजे यांच्या हत्येचा … Read more

Published On: 

तानाजी सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर बार्शी येथील सभेत ‘माझा बाप मारला,माझा बाप मारला’, म्हातारा झाला तरी मडपीक 15 वर्षे घेणार का अशी टीका केली होती. आता ओमराजे निंबाळकर यांनी ‘खेकडामंञी’ ‘बायलर कोंबडी’ ‘अंडा’ आणि ‘जर्सी गाय’ असे म्हणत टीका केली आहे.

ओमराजे निंबाळकर (omraje nimbalkar) म्हणाले, ”आजपर्यंतच्या निवडणुकीच्या भाषणात एकदाही स्व.पवनराजे यांच्या हत्येचा विषय काढला नाही. उलट पवनराजे ह्यात असते तर ओमराजे बघायला ही भेटला नसता, इंजिनिअरिंग करुन तिकडच बसला असता. बरं माझ्या वडीलांची हत्या झाली हे काय खोटं आहे का?

त्यामुळे देवेंद्र फडणवीस स्वत: तिकडे आहेत. खेकडामंत्री यांना माझं जाहीर आवाहन आहे की, पवनराजे यांच्या हत्येचे प्रकरण शेवटच्या टप्प्यात आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण द्या एका महीन्यात निकाल लावा, तुमच्या हातात आहे. पण निकाल का देत नाही कारण त्यांना माहीती आहे की, दोषी सापडणार आहे. मात्र 2006 पासून 2024 आजपर्यंत केवळ प्रकरण वाढवायचं काम सुरु असल्याचे ओमराजे निंबाळकर म्हणाले.

काय म्हणाले होते तानाजी सावंत 

ओमराजे निंबाळकर यांनी एक रूपयांचा विकास केला ना कुणाला एक रुपयांची मदत केली. 2009 पासून आजपर्यंत ओमराजे निंबाळकर यांच्या भाषणाची सुरूवात माझा बाप मारला, माझा बाप मारला, अशी होते. अरं काय लावलंय हे?

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही