eknath khadse मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये घरवापसीमध्ये अडथळे असून काही नेत्यांच्या विरोधामुळे अद्याप त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त मिळालेला नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधामुळे खडसे यांच्या पक्षप्रवेशास पक्षश्रेष्ठींनी अद्याप हिरवा कंदील दाखविलेला नसल्याचे समजते.
खडसे यांनी दोन-तीन आठवड्यांपूर्वी नवी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह व अन्य ज्येष्ठ भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. अन्य पक्षांमधून भाजपमध्ये येण्यास इच्छुक नेत्यांना प्रवेश देण्यासंदर्भात भाजपने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीमध्ये केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा समावेश आहे. तावडे हे खडसे यांच्या भाजप प्रवेशास अनुकूल आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मुरलीधर मोहोळ यांच्याकडे २४ कोटींची मालमत्ता
- पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ नव्हे तर ‘कायद्याचा पॅटर्न’; पोलीस आयुक्तांचा गुंडांना इशारा
- शहरातील गुंडांची झाडाझडती; ४२ पिस्तुले, ७४ काडतुसे जप्त
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







