Share

पेटीएम पेमेंट्स बँकेचे मुख्याधिकारी सुरिंदर चावला यांचा राजीनामा

Paytm CEO Surinder Chawla । वृत्तसंस्था, नवी दिल्ली अडचणीत सापडलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरिंदर चावला यांनी राजीनामा दिला आहे, अशी माहिती बँकेने मंगळवारी भांडवली बाजाराला दिली. देशाच्या डिजिटल वित्तीय व्यवहारांच्या क्षेत्रातील अग्रणी ‘पेटीएम’च्या व्यवहारांवर प्रक्रिया करणाऱ्या ‘पेटीएम पेमेंट्स बँके’वर जानेवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेने कारवाईचा बडगा उगारला होता. Related News for … Read more

Published On: 

Paytm CEO Surinder Chawla । वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अडचणीत सापडलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरिंदर चावला यांनी राजीनामा दिला आहे, अशी माहिती बँकेने मंगळवारी भांडवली बाजाराला दिली.

देशाच्या डिजिटल वित्तीय व्यवहारांच्या क्षेत्रातील अग्रणी ‘पेटीएम’च्या व्यवहारांवर प्रक्रिया करणाऱ्या ‘पेटीएम पेमेंट्स बँके’वर जानेवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेने कारवाईचा बडगा उगारला होता.

बँकेला प्रतिबंधात्मक कारवाईचा सामना करावा लागत असतानाच चावला यांच्या राजीनाम्याने बॅंकेसमोरील आव्हान वाढले आहे.

सुरिंदर चावला यांनी रविवारी, ८ एप्रिलला वैयक्तिक कारणांमुळे आणि अधिक चांगल्या संधी शोधण्यासाठी राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. येत्या २६ जून २०२४ रोजी ते पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी पदाच्या कार्यभारातून मुक्त होतील. गेल्या वर्षी म्हणजेच जानेवारी २०२३ मध्ये चावला पेटीएम पेमेंट्स बँकेत रुजू झाले होते.

Paytm Payments Bank CEO Surinder Chawla resigns

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही