Prithviraj Chavan कराड : महाविकास आघाडीकडून साताऱ्याची जागा राखण्यासाठी प्रबळ उमेदवार म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरु आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सकाळी पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेतली.
सातारा मतदारसंघात भाजपाचे उदयनराजे भोसले आणि शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील या दोन खासदारांमध्ये आणि संभाव्य उमेदवारांमध्ये लढत होण्याची चिन्हे होती. पण, आजारपणाचे कारण पुढे करीत श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली. उदयनराजेंसमोर शरद पवार गटाचा तगडा उमेदवार नसल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पृथ्वीराज चव्हाणांचे नाव चर्चेत आले.
जयंत पाटील यांनी कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या निवासस्थानी चर्चा केली. पृथ्वीराज चव्हाणांनी साताऱ्याची जागा लढवावी, असा शरद पवारांचा सांगावा घेऊन त्यासंदर्भात चर्चेसाठीच जयंत पाटील हे चव्हाण यांच्या भेटीला आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या
- नाना पटोलेंचा भाजप नेत्यांशी छुपा संबंध; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
- Pune | ५ जूनपासून सिंहगड किल्ल्यावर प्लास्टिक बंदी
- हार्दिक पांड्याची मुंबईत मोठी परीक्षा; मुंबईचा राजा ‘रोहित’ वानखेडेवर जयघोष
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.





