Share

Manoj Jarange | मराठा समाजातील नेत्यांचा पाठिंबा मिळाला तर दोन तासात आरक्षण मिळेल – मनोज जरांगे

Manoj Jarange | सातारा: महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी राज्यामध्ये आंदोलन सुरू केलं आहे. त्यांच्या (Manoj Jarange) या आंदोलनावरून राज्याचं राजकारण देखील चांगलं तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजातील नेत्यांना धारेवर धरलं … Read more

Published On: 

Manoj Jarange | सातारा: महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी राज्यामध्ये आंदोलन सुरू केलं आहे.

त्यांच्या (Manoj Jarange) या आंदोलनावरून राज्याचं राजकारण देखील चांगलं तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजातील नेत्यांना धारेवर धरलं आहे.

आम्हाला मराठा समाजातील राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळत नाही, त्यांचा पाठिंबा मिळाला तर 2 तासात आरक्षण मिळेल, असं विधान मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलं आहे.

Manoj Jarange commented on Maratha reservation

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी मी एकटा लढत नाहीये. माझ्यासोबत 50 ते 60 टक्के मराठा समाज उभा आहे.

म्हणजेच माझ्यासोबत 6 कोटी लोकं आहे. आमचा समाज एकत्र आला आहे. परंतु, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील राजकीय नेत्यांचा पाठिंबा आम्हाला मिळत नाही.

आम्हाला जर त्यांचा पाठिंबा मिळाला तर फक्त दोन तासात मराठ्यांना आरक्षण मिळेल. परंतु, ते मराठ्यांना पाठिंबा देणार नाही. त्यांनी 70 वर्ष फक्त आमचा वापर करून घेतला आहे. त्यांना फक्त आम्ही हवे आहोत.”

दरम्यान, मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी समाजासह ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी ओबीसी नेत्यांना इशारा दिला आहे.

“मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे, याची मला पूर्ण खात्री आहे. मराठा समाज ताकतीने एकत्र आला आहे. गोरगरीब मराठा समाजासाठी आमचा हा लढा सुरू आहे.

त्याचबरोबर या आंदोलनादरम्यान आमच्या समाजाने कुणाच्याही विरोधात वाईट विधान केलेलं नाही. त्यामुळे मराठ्यांच्या विरोधात कुणी काही बोललं तर आम्ही त्याला सोडणार नाही”, असं मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange) म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही