Rohit Pawar | ओबीसी नेत्यांना पुढे करून देवेंद्र फडणवीस वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करताय – रोहित पवार

Rohit Pawar | बीड: राज्यामध्ये मराठा समाजाने आरक्षणासाठी मोठा लढा उभा केला आहे. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यानंतर मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आलेला दिसला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

Published On: 

Rohit Pawar | बीड: राज्यामध्ये मराठा समाजाने आरक्षणासाठी मोठा लढा उभा केला आहे. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.

मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यानंतर मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आलेला दिसला आहे.

याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी नेत्यांना पुढे करून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलत असताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “30 ऑक्टोबर 2023 रोजी बीडमध्ये जो काही प्रकार घडला त्यावेळी पोलीस फक्त हातावर हात ठेवून उभे होते.

ही घटना घडत असताना पोलिसांनी साधा सायरन देखील वाजवला नाही. या घटनेमध्ये ज्या लोकांचा समावेश आहे, त्यांना सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, अशा चर्चा जनसामान्यांमध्ये सुरू आहे.

सामान्य जनतेसोबतच आम्हाला देखील असाच संशय आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांना पुढे करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर सत्तेत असणाऱ्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्याची गरज आहे.”

Will Ajit Pawar meet Sharad Pawar?

दरम्यान, आज देशामध्ये दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawa) यांनी आपल्या परिवारासह बारामती येथील गोविंद बागेत दिवाळी पाडवा साजरा केला.

दरवर्षी पवार कुटुंब दिवाळी पाडव्यानिमित्त गोविंद बागेत एकत्र येतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फूटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

याच पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी रोहित पवारांना (Rohit Pawar)   प्रश्न विचारला. पाडव्यानिमित्त अजित पवार शरद पवारांची भेट घेणार का?

यावर उत्तर देत रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “अजित पवार हे शरद पवार यांना भेटतील की नाही? याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही. अजित पवारांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, कुटुंबातील व्यक्तीला भेटायला काय हरकत आहे?”

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही