Share

Maratha Reservation | मराठ्यांना संविधानिकदृष्ट्या आरक्षण देता येत नाही; गुणरत्न सदावर्ते आक्रमक

🕒 1 min readMaratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी राज्यात आंदोलन सुरू केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीदरम्यान राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मोठं आंदोलन उभं करू, असा इशारा मराठा समाजाने राज्य शासनाला … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी राज्यात आंदोलन सुरू केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

या मुदतीदरम्यान राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मोठं आंदोलन उभं करू, असा इशारा मराठा समाजाने राज्य शासनाला दिला आहे.

अशात वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मराठा आरक्षणाविरोधात आक्रमक भूमिका मांडली आहे. मराठा समाजाला संविधानिकदृष्ट्या आरक्षण देता येत नसल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर मराठा समाजाचं आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Gunaratna Sadavarte cmmented on Maratha Reservation

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उपोषण करण्याचा अधिकार आहे. परंतु, जी माणसं मागास नाहीये, त्यांना आपण मागास ठरवण्याच्या भानगडीत पडत आहोत.

आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेवटच्या भाषणातील मुद्दे विसरलो आहोत का? सरकारला दुसरी बाजू ऐकून विचार करण्याची गरज आहे.

गायकवाड आयोगाने राजकारणामध्ये आरक्षण सांगितलेलं नव्हतं. त्याच्यापुढे जाऊन जर आपण असं करायला लागलो तर डेड एंड येईल.

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिलं पाहिजे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. परंतु, ते विहित पद्धतीत बसलं पाहिजे. हे आरक्षण संविधानिकदृष्ट्या देता येत नाही. त्यामुळे सरकारने याबाबत सारासार विचार करायला हवा.

दरम्यान, मराठा समाजाचं आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन हिंसक वळण घेताना दिसलं होतं. आंदोलकांकडून जागोजागी फोडाफोडी, जाळपोळ, दगडफेक होताना दिसली.

याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 8 नोव्हेंबर रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!