Share

Maratha Reservation | माझ्या मुलाने जे केलं ते मराठा समाजासाठी केलं, त्यामुळं त्याला सोडावं; मंगेश साबळेंची आई भावूक

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन करत आहे. मराठा समाजाचं हे आंदोलन सुरू असताना वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या (Gunaratna Sadavarte) गाडीची तोडफोड झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगेश साबळे या मराठा तरुणांने ही तोडफोड केली आहे. यानंतर मनोज साबळे यांच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते … Read more

Published On: 

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन करत आहे.

मराठा समाजाचं हे आंदोलन सुरू असताना वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या (Gunaratna Sadavarte) गाडीची तोडफोड झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मंगेश साबळे या मराठा तरुणांने ही तोडफोड केली आहे. यानंतर मनोज साबळे यांच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

याच पार्श्वभूमीवर मंगेश साबळे यांच्या आई चंद्रकला साबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मुलाने जे केलं ते मराठा समाजासाठी केलं त्यामुळे त्याला सोडावं, असं मंगेश साबळे यांच्या आईने म्हटलं आहे.

Gunaratna Sadavarte commented on Maratha Reservation

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मंगेश साबळे यांच्या आई (चंद्रकला साबळे) म्हणाल्या, “माझ्या मुलाने काही फार मोठा गुन्हा केलेला नाही. तो फक्त आणि फक्त मराठा समाजासाठी (Maratha Reservation) लढत आहे.

त्याला न्याय हवा आहे, त्यामुळे त्याला न्याय मिळाला पाहिजे. गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडून त्याने काही मोठा गुन्हा केलेला नाही. यासाठी त्याला अटक झाली आहे.

परंतु, त्याला सोडून द्यायला हवं. कारण त्याचा गुन्हा काही एवढा मोठा नाही. समाजासाठी तो उपोषण करत आहे. मराठा समाजासाठी (Maratha Reservation) तो लढत आहे.”

Sanjay Gaikwad commented on Gunaratna Sadavarte

दरम्यान, या प्रकरणावरून संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले, “गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळे मराठा समाजाचं (Maratha Reservation) आरक्षण हिरावून घेतलं गेलं.

त्यावेळी त्यांनी अत्यंत प्रखरपणे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात बाजू मांडली. त्यामुळे त्यांच्या गाडीची तोडफोड, ही अत्यंत कमी शिक्षा आहे. त्यांच्या गाडी ऐवजी त्यांना संपवायला हवं होतं. ते संपले असते तर मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मार्ग मोकळा झाला असता.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही