Share

Ajit Pawar | चौकशी करा नाही तर काहीही करा मला फरक पडत नाही; बोरवणकरांच्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया

🕒 1 min readAjit Pawar | पुणे: अजित पवारांनी आर आर पाटलांचा विरोध असतानाही पोलिसांची जमीन बिल्डरांना द्यायला सांगितली होती, असा गंभीर आरोप मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी अजित पवारांवर केला आहे. मीरा बोरवणकर यांच्या या आरोपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चौकशी करा नाही तर काहीही करा मला काही फरक पडत नसल्याचं … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | पुणे: अजित पवारांनी आर आर पाटलांचा विरोध असतानाही पोलिसांची जमीन बिल्डरांना द्यायला सांगितली होती, असा गंभीर आरोप मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी अजित पवारांवर केला आहे.

मीरा बोरवणकर यांच्या या आरोपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चौकशी करा नाही तर काहीही करा मला काही फरक पडत नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

I have nothing to do with the allegations made by Meera Borwankar – Ajit Pawar

प्रसार माध्यमांशी बोलत असताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. सरकारचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होईल, अशा प्रकारचे काम मी करत नाही.

पालकमंत्री आपापल्या पद्धतीने काम करत असतात. चौकशी करा नाही तर काहीही करा मला काही फरक पडत नाही. कारण मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांशी माझा काही संबंध नाही.

त्याचबरोबर त्यांनी केलेल्या आरोपांना मी फारसं मनावर घेत नाही. मी आणि माझं काम भलं. त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीचा आढावा घेणं म्हणजे हस्तक्षेप करणं, असा होत नाही.”

दरम्यान, या प्रकरणावर कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) केलेले आरोप म्हणजे दादांविरोधात मोठं षडयंत्र आहे.

श्रेयवादाच्या लढाईमधून अजित पवारांना बदनाम केलं जात आहे.” तर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!