Share

Devendra Fadnavis | मनोज जरांगेंच्या सभेनंतर भाजपने शेअर केला देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ

🕒 1 min readDevendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: आज अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाहीर सभा पार पडली. येत्या दहा दिवसात मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मोठं आंदोलन करू, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. जरांगे यांच्या या भव्य सभेला लाखो मराठा बांधव उपस्थित होते. Related … Read more

Published On: 

🕒 1 min read

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: आज अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाहीर सभा पार पडली.

येत्या दहा दिवसात मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मोठं आंदोलन करू, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. जरांगे यांच्या या भव्य सभेला लाखो मराठा बांधव उपस्थित होते.

या सभेनंतर भारतीय जनता पक्षानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना दिसत आहे.

The demand for reservation made by the Maratha community is right – Devendra Fadnavis

भाजपने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणतात, “मराठा समाजाने केलेली आरक्षणाची मागणी योग्य आहे. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं.

मात्र, ते हायकोर्टाने अवैध ठरवलं होतं. सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेचं सरकार हे आरक्षण टिकवू शकलं नाही. मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ, असा मला विश्वास आहे.

कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी न करता ज्याप्रमाणे आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, त्याचप्रमाणे आता देखील मराठा आरक्षणासाठी आमचं सरकार कटीबद्ध आहे.”

दरम्यान, आज झालेल्या सभेमध्ये मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. “एकतर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल.

येत्या दहा दिवसात सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही सरकारला 40 दिवसाची मुदत दिली होती. त्यातले 30 दिवस संपले आहेत.

आज मी सरकारला आरक्षणासाठी शेवटची विनंती करत आहे. मी दिलेला शब्द पाळला, त्याप्रमाणे सरकारने देखील दिलेला शब्द पाळायला हवा”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही