Share

Chhagan Bhujbal | अजित पवार मुख्यमंत्री कसे होणार? छगन भुजबळ म्हणतात…

🕒 1 min readChhagan Bhujbal | नाशिक: 2 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा शपथविधी होताच अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं … Read more

Published On: 

🕒 1 min read

Chhagan Bhujbal | नाशिक: 2 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

हा शपथविधी होताच अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Ajit Dada’s people should be elected in every place in the elections – Chhagan Bhujbal

नाशिकमध्ये बोलत असताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, “आमचा एक-एक आमदार तीन-तीन लाख लोकांचा प्रतिनिधी आहे. असेच 50, 55 आमदार अजित पवारांच्या पाठीशी असतील तर अजित पवारांच्या मागे केवढ मोठं पाठबळ आहे.

अजित पवारांच्या पाठीशी एवढे लोक असतील तर न्यायाचा तराजू अजित पवारांच्या बाजूने झुकणार, याबद्दल माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही. अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, हे सगळे म्हणत असतात.

मात्र, अजित पवार कसे मुख्यमंत्री होणार? त्यासाठी सर्वांना काम करावं लागणार आहे. आज असलेला 45 चा आकडा सर्वांना मिळून 80 वर नेऊन ठेवायचा आहे. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील.

यासाठी आपल्याला झटावं लागणार आहे. निवडणुकांमध्ये प्रत्येक ठिकाणी अजित दादांचे लोक निवडून आले पाहिजे. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची जबाबदारी आपल्याला उचलावी लागणार आहे.

यावेळी बोलत असताना त्यांनी (Chhagan Bhujbal) आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. कुणाच्याही आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा आरक्षणाला आमचा अजिबात विरोध नाही.

या आरक्षणासाठी आमचा पाठिंबा आहे. ओबीसी आणि इतर घटकांच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठ्यांना आरक्षण द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. मी जी भूमिका मांडत आहे तीच भूमिका शरद पवार, नाना पटोले आदी नेते मंडळी मांडतात.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!