🕒 1 min read
Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: 03 ऑक्टोबर 2023 रोजी दादरमध्ये भारतीय जनता पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप नेत्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं असल्याची माहिती मिळाली होती.
त्याचबरोबर या बैठकीमध्ये त्यांनी मोठं विधान केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आपल्या सोबत सत्तेत सहभागी झाले असले तरी महाराष्ट्रात भाजपच बॉस असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं असल्याची माहिती मिळाली होती.
याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शासकीय रुग्णालयात लोकांचा जीव जात असताना सरकारमध्ये बॉस कोणी याची स्पर्धा सुरू असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
There is a competition going on who is the boss in the government – Vijay Wadettiwar
ट्विट करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “सुविधांअभावी शासकीय रुग्णालयात लोकांचा जीव जाताना सरकार मध्ये #बॉस कोण याची स्पर्धा सुरू आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात : महाराष्ट्रात “भाजप बॉस” आहे. शिंदे गटाचे मंत्री म्हणतात: महाराष्ट्रात “एकनाथ शिंदे बॉस” आहे.
सत्तेच्या अहंकारात बेधुंद झालेल्या दोघांनाही कुणीतरी सांगा की महाराष्ट्रात जनताच “बॉस” आहे. महाराष्ट्राची जनता हीच खरी बॉस आहे, जी यांचा अहंकार २०२४ मध्ये उतरवल्या शिवाय राहणार नाही.”
दरम्यान, नांदेड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
ट्विट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी अब्जाधीश-कोट्यधीश जात नाहीत, पण गोरगरीब जनता जाते. कारण त्यांच्यासाठी शासकीय रुग्णालयांतील उपचार परवडणारे असतात.
या गरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचा सरकारने त्याग केला आहे का? गोरगरिबांच्या जीवाचं सरकारला काहीच मोल वाटत नाही का?”
महत्वाच्या बातम्या
- Pravin Darekar | खोट्या मनुवृत्तीच्या उद्धव ठाकरेंचे समर्थन करताना संजय राऊतांचा रोज पोपट होतो – प्रवीण दरेकर
- Sanjay Raut | आम्हाला देवेंद्र फडणवीसांची दया येते – संजय राऊत
- Jayant Patil | सुरू असलेल्या सर्व कामांना स्थगिती देऊन शिंदे-फडणवीस नक्की कोणाची प्रगती करणार होते? – जयंत पाटील
- Supriya Sule | जबाबदारीचा सरकारने त्याग केला का? – सुप्रिया सुळे
- Uddhav Thackeray | निष्पक्ष रहा, सुडाने कारवाया करू नका; ठाकरे गटाचा केंद्र सरकारला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











