Share

Ajit Pawar | अजित पवारांनी निधी वाटपामध्ये भेदभाव केला – यशोमती ठाकूर

🕒 1 min readAjit Pawar | मुंबई: अजित पवार निधी वाटपामध्ये भेदभाव करतात, असं म्हणत शिंदे गटातील काही आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. त्यानंतर भाजप-शिंदे सरकारमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यशस्वीरित्या वर्षभर सरकार चालवलं. एका वर्षानंतर अजित पवार पुन्हा एकदा सत्तेत सामील झाले. सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवारांकडे अर्थ खात देण्यात आलं. त्यानंतर … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | मुंबई: अजित पवार निधी वाटपामध्ये भेदभाव करतात, असं म्हणत शिंदे गटातील काही आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. त्यानंतर भाजप-शिंदे सरकारमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यशस्वीरित्या वर्षभर सरकार चालवलं.

एका वर्षानंतर अजित पवार पुन्हा एकदा सत्तेत सामील झाले. सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवारांकडे अर्थ खात देण्यात आलं. त्यानंतर अजित पवारांच्या जुन्या तक्रारी पुन्हा एकदा नव्यानं समोर आल्याचं दिसत आहे.

अजित पवारांना अर्थमंत्री पद स्वीकारून साधारण दोन आठवडे झाले आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना भरघोस निधी दिला आहे.

त्याचबरोबर त्यांनी शिंदे गटातील आमदारांना देखील चांगला निधी उपलब्ध करून दिला. मात्र, पवारांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना पुरेसा निधी दिला नसल्याचा आरोप काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केला आहे.

Ajit Pawar has given huge funds to NCP MLAs – Ajit Pawar

अजित पवारांनी त्यांच्यासोबत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भरघोस निधी दिला आहे. परंतु आम्हाला काहीच निधी दिला नाही.

त्यांनी फक्त काँग्रेसच्या काही निवडक आमदारांनाच निधी दिला असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. आम्हाला निधी न देण्याचं काय कारण? असा सवाल देखील यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, अजित पवार यांना अर्थ खात देण्यासाठी भाजप आणि शिंदे गटातील काही आमदारांनी तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र, तरीही त्यांनाच अर्थ खाते देण्यात आलं.

त्यानंतर निधीवाटपाच्या वेळी अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटातील आमदार नाराज होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत निधी वाटप केल्याचं दिसून आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!