Share

Chhagan Bhujbal | “आदित्य ठाकरे 15 वर्षांपूर्वी येवल्यात आले…”; छगन भुजबाळांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं

🕒 1 min readChhagan Bhujbal | मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारीला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) नाशिक दौऱ्यावर जाणार आहे. त्यांच्या या नाशिक दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी येवल्याचा विकास बघावा, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.Related News … Read more

Published On: 

🕒 1 min read

Chhagan Bhujbal | मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारीला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) नाशिक दौऱ्यावर जाणार आहे.

त्यांच्या या नाशिक दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी येवल्याचा विकास बघावा, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Chhagan Bhujbal has entered Nashik city

सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाला दोन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाशिक शहरात दाखल झाले आहे. नाशिकमध्ये पोहोचताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यावर टीका केली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, “आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष फिरत आहे. त्याचबरोबर पावसाळी अधिवेशनाला सुट्टी असल्यामुळे अनेक नेते दौरे करत आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “आदित्य ठाकरे जर 15 वर्षांपूर्वी येवल्यात आले असते, तर त्यांना आधीच्या येवल्यात आणि आत्ताच्या येवल्यात फरक कळला असता.” छगन भुजबळ यांच्या या प्रतिक्रियावर आदित्य ठाकरे काय उत्तर देतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ते शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहे.

सातपूर येथील डेमोक्रसी हॉल या ठिकाणी हा मेळावा पार पडणार आहे. मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे येवल्याच्या दिशेनं रवाना होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!