Share

Gulabrao Patil | राष्ट्रवादीनंतर आता काँगेसही फुटणार; गुलाबराव पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य

🕒 1 min read Gulabrao Patil | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै रोजी राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. या घटनेचा धक्का पाचावला जात असतानाच आणखीन एक मोठा धक्का बसणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीनंतर काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याचं गुलाबराव … Read more

Published On: 

🕒 1 min read

Gulabrao Patil | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै रोजी राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. या घटनेचा धक्का पाचावला जात असतानाच आणखीन एक मोठा धक्का बसणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीनंतर काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Congress MLAs will split after NCP – Gulabrao Patil

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले, “नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) काल राज्य सरकारमध्ये सामील झाल्या. खरंतर त्यांना पक्षप्रवेश करण्याची गरज नव्हती. मात्र, दाल में कुछ काला है, असं त्यांना वाटलं म्हणून त्या आमच्या बरोबर आल्या. सध्या राजकारणात जे काही सुरू आहे, ते तुम्ही बघत आहात. त्यामुळे इथे उद्या काय होईल? काही सांगता येत नाही.

पुढे बोलताना ते (Gulabrao Patil) म्हणाले, “काँग्रेसचे आमदारही तयार आहे, असं मी ऐकलं आहे. सध्या काही सांगता येत नाही. ते कुणाबरोबर जातील हे माहीत नाही. पण ते कुठेतरी जातील अशा चर्चा सुरू आहे.”

“विखे पाटील आणि त्यांचा मुलगा भाजपकडून निवडणूक लढेल, असं मी गेल्यावेळी सांगितलं होतं. त्यानंतर तेचं झालं. अजित पवार आपल्यासोबत येतील असही मी दोन महिन्यापासून सांगत होतो आणि तेचं झालं. त्याचप्रमाणे आता काँग्रेसवाले पण लवकरच येतील”, असही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही