Sanjay Raut | येवल्यात भुजबळांचा पराभव करू – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) देखील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर आज शरद पवार (Sharad Pawar) पहिली जाहीर सभा घेणार आहे. त्यांची ही जाहीर सभा नाशिकमध्ये होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) देखील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर आज शरद पवार (Sharad Pawar) पहिली जाहीर सभा घेणार आहे. त्यांची ही जाहीर सभा नाशिकमध्ये होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

We defeated Chhagan Bhujbal in Mumbai – Sanjay Raut

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “छगन भुजबळ यांना आम्ही मुंबईत पराभूत केलं. त्याचबरोबर नाशिकला लोकसभेत त्यांना हरवलं. छगन भुजबळ विधानसभेत नसतील. त्याचबरोबर येवल्यामध्ये पुढचा आमदार हा शिवसेना ठाकरे गटाचाच असेल. मी पांडुरंगाच्या दारात सांगतो की आम्ही छगन भुजबळ यांचा पराभव करू.”

यावेळी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नीलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रवेशावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “नीलम गोऱ्हे यांची मला लाज वाटते. त्यांना जे-जे हवं होतं, ते-ते आम्ही त्यांना दिलं. तरीही त्या पक्ष सोडून गेल्या. त्यांच्यामध्ये थोडी जरी नैतिकता असती तर त्या राजीनामा देऊन गेल्या असत्या.”

“आतापर्यंत त्यांना मिळालेलं प्रत्येक पद फक्त शिवसेना आणि ठाकरेंमुळे मिळालेलं आहे. मात्र चार-पाच महिन्यासाठी पद टिकवण्यासाठी कोणी जर अशा प्रकारची बेइमानी करत असेल तर आम्ही त्यांना राजकीय श्रद्धांजली वाहतो”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही