Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. काल (7 जुल) ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) शिंदे गटात सामील झाल्या आहे. यावरून दोन्ही गट पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप करताना दिसले आहे. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी सुषमा अंधारेंवर (Sushma Andhare) टीका केली आहे.
नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सुषमा अंधारे यांना धारेवर धरलं आहे. ठाकरे गट आता ओवेसींना बोलवून नेता करतील का? असा सवाल देखील आशिष शेलार यांनी या ट्वीटमध्ये उपस्थित केला आहे.
Will Owaisi be the leader? – Ashish Shelar
ट्विट करत आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “सुषमाताईंची संवाद यात्रा विश्वविख्यातांच्या तोंडाचा पट्टा पक्षात “अंधार(रे)” दाटता. शेवटी राहिलेल्या निलमताई पण सोडून गेल्या. आता काय ओवेसींना बोलावून नेता करता?”
सुषमाताईंची संवाद यात्रा
विश्वविख्यातांच्या तोंडाचा पट्टा
पक्षात "अंधार(रे)" दाटताशेवटी राहिलेल्या
निलमताई पण सोडून गेल्याआता काय ओवेसींना बोलावून नेता करता?
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 8, 2023
दरम्यान, सुषमा अंधारे ठाकरे गटात आल्यामुळे गटातील महिला नेत्या नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. म्हणून तुम्ही ठाकरे गट सोडला का? या प्रश्नाचं उत्तर देत असताना नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारेंना टोला लगावला आहे. पक्षात सटरफटर लोक आल्यानं आम्ही नाराज होत नाही, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार? विधानसभा अध्यक्ष बजावणार नोटीस
- Jayant Patil | पुरोगामी विचारांचे वादळ उठणार महाराष्ट्रभर पसरणार; जयंत पाटलांचं ‘ते’ ट्विट चर्चेत
- Sanjay Raut | “… म्हणून आम्हाला त्यांची लाज वाटते”; संजय राऊतांचा नीलम गोऱ्हे यांच्यावर घणाघात
- Devendra Fadnavis | “महाविकास आघाडी तुटणं…”; देवेंद्र फडणवीसांचं भाजप आमदारांना स्पष्टीकरण
- Jitendra Awhad | अजितदादांनी परत यावं, हवं तर मी सगळं सोडून जातो; जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक वक्तव्य