Devendra Fadnavis | “महाविकास आघाडी तुटणं…”; देवेंद्र फडणवीसांचं भाजप आमदारांना स्पष्टीकरण

Devendra Fadnavis | मुंबई: सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राजकारणात मोठा भूकंप आला होता. यावरून शिंदे गट आणि भाजप गटातील आमदार नाराज असल्याचं बोललं जात होतं. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सर्व आमदारांची मुंबईत काल (7 जुलै) एक बैठक घेतली. आपल्याला बेरजेचं राजकारण करावं लागलं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदारांना सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये बेरजेचं राजकारण करणे अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यासाठी महाविकास आघाडीचं तुटणं खूप आवश्यक होतं. कारण महाविकास आघाडीची बेरीज आपल्यासाठी घातक ठरणार होती.”

All be ready to sacrifice for Narendra Modi

पुढे बोलताना ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला हे निर्णय घ्यावे लागले आहेत. येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला अनेक त्याग करावे लागू शकतात. त्यामुळे तुम्ही सर्वांनी त्याग करण्यासाठी तयार राहा. येणारा काळा आपलाच असेल याची मी तुम्हाला खात्री देतो.”

“पक्ष मजबूत करण्यासाठी आपल्या सर्वांना कामाला लागावं लागणार आहे. पक्षानं दिलेले सर्व कार्यक्रम योग्य पद्धतीनं झाले पाहिजे. तुम्हाला एकत्र येऊन तुमची ताकद एकत्र करावी लागणार आहे”, असही ते (Devendra Fadnavis) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.